Saturday, 19 December 2015

प्रेम म्हणजे काय? बाजीराव मस्तानी च्या निमित्तानी मनात आलेल्या काही भावना!

बाजीराव मस्तानी - हि केवळ एक प्रेमकथा  किंवा  सिनेमा  नाही । ते एक युद्ध  आहे… एक रणसंग्राम आहे जो बाजीरावासारख्या अजिंक्य  योद्ध्यालाही  हरवून  आणि हारता  हारता कायमचा जिंकवून गेला। इतिहासातच नव्हे तर कुठे तरी  त्या विध्यात्याच्या मनातही या  निस्सीम आणि निर्व्याज प्रेमाचा अजरामर ठसा उमटवून गेला..  राधा कृष्णालाही हेवा वाटावा असा हा प्रेमाचा प्रचंड  स्त्रोत आहे .
एका असामान्य  लढवय्या नि त्याच्या  प्रेयसीवर केलेला अपाड प्रेम। ज्याचा थांग न त्याला लागला । ना  त्या अनामिक मस्तानी ला जिनी स्वताच संपूर्ण  आयुष्य बाजीरावावर किती सहजतेनी ओवाळून टाकल। ना अत्यंत एकनिष्ठ आणि निखळ प्रेमाचा झरा बनून आपल्या पतीची आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत  कोणत्याही अपेक्षेशिवाय साथ देणाऱ्या भोळ्या काशीला । खूप भाग्य असाव लागत अस आयुष्य जगायला । इतक्या उच्च कोटीच प्रेम एवढ्या जवळून अनुभवायला आणि तितकच  साहस  आणि विश्वास असावा लागतो ते प्रेम आयुष्यभर आणी त्यानंतरही अबाधित ठेवायला ! जे खुद्द कृष्णाला जड  गेला । राधेच्या आणी रुक्मिणीच्या असीम प्रेमापुढे आणी भक्तीपुढे जिथे तो तोकडा पडला तिथे बाजीरावाची ती काय गत ..


 बाजीराव हा एक तळपता तेजोमय सूर्य ज्याच्या प्रकाशात लाखो मराठ्यांचा आयुष्य उजळून निघालं । तसच ते खास क्कारून दोन व्यंक्तींचा  हि निघालं । काशीबाई - जी एखाद्या सुर्याफुलासारखी। केवळ त्या सुर्यासाठीच फूललेली । त्याच्याकडेच झुकलेली । आणि मस्तानी - एखाद्या तृन्फुलासारखी ज्याच्यात जिद्द एवढी आहे कि ते त्या सूर्याच्या केवळ एका प्रकाश किरणाच्या जोरावर बंजर  वैराण माळरानातही सहजतने उगवू शकते आणि तग धरून राहू शकते। मग त्तीला कोणत्याही वादळाची तमा नाही कि तुफानाची फिकीर  नाही


कुणाच प्रेम मोठ ? मस्तानि साठी दिवसरात्र तीळ तीळ  तुटणाऱ्या आणि काशिवरही आपल्याकडून अन्याय होऊ नये या साठी मनोमन झुरणाऱ्या बाजीरावाच? बाजीरावासाठी स्वतःच  माहेर कसलाही विचार, कोणतीही परवा न करता सोडून येऊन बाजीरावाच्याच जवळच्या लोकांकडून झालेला विषारी तिरस्कार आणी अपमान "अमृत " म्हणून स्वीकारणाऱ्या मस्तानीच  कि आपल्या पतीच आपल्याहून जास्त प्रेम आपल्या  सवतीवर आहे हे माहीत  असूनही ते सगळा विष स्वतः एकटीनी  पचवून केवळ आपल्या पतीच्या सुखासाठी मस्तानीला आणि  तिच्या मुलाला जीवनदान देणाऱ्या भोळ्याभाबड्या काशीचा? सगळ काही आपल्या विचारशक्तीच्या पलीकडच आहे


पण मग नंतर विचार येतो कि कोण वरचढ आहे हे ठरवायला हि काही स्पर्धा नाही..  हि एक निरागस आणी निस्सीम अजरामर प्रेमाची गाथा  आहे.. जी सर्वाला पुरून उरते । मनाला चटका लावून जाते । आणि जाताजाता खूप मोठी प्रेरणा आणी शिकवण देऊन जाते कि प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे..  तेच त्रिवार सत्य आहे..  ते कालातीत आहे ..  देहातीत आहे। शब्दातीत आहे। अबाधित आहे । चांगलं  वाईट । सगळं  काही पचवण्याची आणि सर्वाना  सामावून घेण्याची ताकद त्याच्यात आहे। अस  प्रेम जर कधी अनुभवायला मिळाला तर मिळालेल्या एका जन्मात हजार आयुष्य जगल्याच समाधान आहे..
मृत्युनंतर काय होते हे कुणालाच माहित नाही । पण जगता जगता अपार  प्रेमाचा परमोच्च बिंदू अनुभवणं हेच किती सुखदायक आहे..  अजून वेगळं  हवं  तरी काय असत  माणसाला ।   तुटणाऱ्या ताऱ्याला  पाहून काही मागितला कि ते नक्की पूर्ण होतं  असं  म्हणतात । पण प्रेमासाठी आपण स्वतः तुटून  जाण्यात किती सुख आहे हेच हि प्रेमकहाणी आपल्याला शिकवून जाते ..  गोविन्दाग्र्जांच्याच शब्दात सांगायच  झालं  तर -
तो योग खरा हठयोग
प्रीतीचा रोग लागला ज्याला
हे मरण असे भाग्याचे लाभते त्याला !
ते मरण लाभण्याजोगी  अशी हि निराळीच प्रेमकहाणी ! _/\_